एक आईसमान माया
गोधनविकास गोशाळेची गाथा सुरू होते एका साध्या पण अद्वितीय स्त्रीपासून — श्रीमती वैशाली कुलकर्णी, वय ७१.
पोस्टातून स्वेच्छा निवृत्ती घेतली व दिवसभर वेळ कसा घालवावा हा प्रश्न समोर आला. पर्याय खूप होते, पण समाधान अजिबात नव्हते. काहीतरी सेवा कार्य करावे, तसेच डोक्याला व हाताला काम पाहिजे म्हणून गोपालनाची सुरुवात केली. सोलापुरातच थोड्या गाई घेऊन गोपालन सुरू केले आणि त्यांचं आयुष्यच बदललं.
तेव्हापासून आजपर्यंत, स्वतःच्या पेन्शनवर आणि निःस्वार्थ भावनेने त्यांनी ७५ पेक्षा अधिक देशी गायींचं रक्षण, पुनर्वसन व संगोपन केलं आहे.
आमचं कार्य – गाय, गाव आणि गोकृपा
गोधनविकास ही केवळ गोशाळा नाही — ती एक प्रेमाची जागा, निसर्गाशी जोडणारा दुवा, आणि ग्रामीण विकासाचं केंद्र आहे.
आमचं भविष्य – एक पूर्ण परिपाठ
गोधनविकास गोशाळा आता केवळ गोसेवेतच नाही, तर निसर्ग पुनरुज्जीवन, सेंद्रिय शेती प्रशिक्षण, आणि पर्यटन + साधना यांना एकत्र आणणाऱ्या ३५-४० एकरच्या जीवनशैली केंद्रात रूपांतरित होण्याच्या मार्गावर आहे.






