गोधनविकास गोशाळा
गोधनविकास गोशाळा म्हणजे केवळ गायींचं निवासस्थान नाही — ती एक मायाळू गोमातेची सेवा करणारी कर्मभूमी आहे. आमच्याकडे आज २५ पेक्षा अधिक देशी विशेषतः महाराष्ट्रीय जातींच्या (उदा: खिलार, देवणी, लाल कंधारी, कोंकण गिड्डा आणि इतर) गायींचं संगोपन अत्यंत प्रेमाने आणि श्रद्धेने केलं जातं.
गोधनविकास गोशाळेचा उद्देश आहे:
गोशाळेतील जीवन
प्रत्येक गाय आमच्यासाठी एक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचं नाव, स्वभाव, खाण्यापिण्याची सवय, सणांच्या दिवशी पूजा, हे सगळं इथे जपलं जातं — जसं आपण आपल्या घरच्या माणसांना जपतो.
आमच्या गोशाळेत, स्वच्छ आणि मुक्त गोठा, नैसर्गिक औषधींचा वापर, गोमयाचा वापर खत आणि इंधनासाठी, नियमित पूजा आणि गोभक्तांसाठी दर्शन या आणि इतर सुविधांचे नित्य आयोजन तसेच नियोजन केले जाते.
देखरेख आणि संगोपन
अनुभवी गोपालक, स्वयंसेवक आणि पशुवैद्यकांची टीम आहे. प्रत्येक गायीसाठी रोजचा आरोग्य अहवाल, हिवताप-कीड नियंत्रण, आणि ऋतूनुसार आहार योजना तयार केली जाते.
आपण गोशाळेचा भाग कसा बनू शकता?
गोसेवक
गोधनविकास गोशाळेच्या यशाच्यामागे, समर्पित आणि अनुभवी गोसेवकांचा खुप मोठा हातभार आहे. गोसेवा, ग्रामीण सशक्तीकरण, आणि पर्यावरणीय शाश्वतता यांचा आमच्या गोसेवकांना अभिमान आहे. प्रत्येक सदस्य त्यांच्या कौशल्याने आणि निष्ठेने गायींच्या आणि समुदायाच्या कल्याणासाठी अविरत कार्य करतो.
श्रीमती वैशाली कुलकर्णी
संस्थापक व आयुष्यभराची प्रेरणा
सौ वनश्री पुजारी
गव्यसिद्ध, निसर्गोपचार तज्ञ व आरोग्य निरीक्षक
सौ वीरश्री कुलकर्णी
योग तज्ञ व परोपकार संचालक (Director of Philanthropy)
सौ स्मिता कुलकर्णी
सदस्य
सौ धनश्री शिंदे
शेती व पंचगव्य उत्पादन व्यवस्थापक
श्रीमती वीणा कामतकर आणि सौ रत्नप्रभा कोलकर
गोशाळा व्यवस्थापक